Ad will apear here
Next
अ थाउजंड ब्रेन्स - भाग ३


जेफ हॉकिन्स यांच्या ‘अ थाउजंड ब्रेन्स’ या पुस्तकाची ओळख करून देणाऱ्या लेखमालेचा हा तिसरा भाग.... 
....
‘अ थाउजंड ब्रेन्स’ हे पुस्तक तीन भागांमध्ये आहे. पहिल्या भागात हॉकिन्सनं ‘रेफरन्स फ्रेमची थिअरी’ समजावून सांगितली आहे. त्याला हॉकिन्सच्या टीमनं ‘थाउजंड ब्रेन्स थिअरी’ असं नाव दिलं आहे. पहिला भाग वाचून झाल्यावर आपण जगात वावरताना / विचार करताना / कृती करताना मेंदूत काय चालतं ते लक्षात येईल. तसंच बुद्धिमत्ता या संकल्पनेबद्दल यात सविस्तर माहिती आहे.

पुस्तकाचा दुसरा भाग ‘मशिन इंटेलिजन्स’बद्दल आहे. ‘विसाव्या शतकाला जसा कम्प्युटर्सनी आकार दिला तसा एकविसाव्या शतकाला मशिन इंटेलिजन्स आकार देईल. आमची ‘थाउजड ब्रेन्स थिअरी’ आजचा ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ तितकासा ‘इंटेलिजंट का नाही’ हे समजावून सांगते. खरी इंटेलिजंट मशिन्स कशी बनवायची तेही या भागात मांडलं आहे. भविष्यातली इंटेलिजंट मशिन्स कशी दिसतील आणि आपण ती कशा प्रकारे वापरू तेही या भागात मी सांगितलेलं आहे. काही मशिन्स कशी सजग-कॉन्शस असतील आणि आपण त्याबाबत काय करायचं तेही या भागात मी लिहिलं आहे,’ असं खुद्द हॉकिन्स या भागाबद्दल म्हणतो.

इंटेलिजंट मशिन्स हा मानवजातीच्या अस्तित्वाला धोका आहे, आपण तयार केलेलं तंत्रज्ञान मानवजातीचा विनाश घडवेल, असं बऱ्याच लोकांना वाटतं. ते हॉकिन्सला मान्य नाही. मशिन इंटेलिजन्सपासून मानवाला धोका कसा नाही हे हॉकिन्सच्या टीमनं लावलेला शोध विस्तृतपणे सांगू शकतो असा त्याचा दावा आहे; पण माणूस हे तंत्रज्ञान कसं वापरतो यात धोका लपलेला आहे असंही लेखकाचं मत आहे. 



पुस्तकाच्या तिसऱ्या भागात, मेंदू आणि बुद्धिमत्ता या दृष्टिकोनातून मानवजातीकडे पाहायचा प्रयत्न केला आहे. मेंदू जगाबद्दलचं जे मॉडेल तयार करतो, त्यात प्रत्येकाच्या ‘स्व’चाही समावेश असतो. थोडक्यात, आपल्याला प्रत्येक क्षणाचं जे काही आकलन होतं ते जगाचं आपल्याला दिसणारं प्रारूप – सिम्युलेशन आहे. ते वास्तव जग नव्हे. आपल्या जगाबद्दलच्या काही धारणा चुकीच्या असू शकतात असाही ‘थाउजंड ब्रेन्स थिअरी’तून एक निष्कर्ष निघतो. अशा चुकीच्या धारणा सुधारणं/बदलवणं किती अवघड असतं आणि अशा चुकीच्या धारणा आपल्या पूर्वापार चालत आलेल्या भावनांबरोबर एकत्र झाल्या तर आपल्या अस्तित्वाला कसा धोका आहे हे या भागात लेखकानं मांडलं आहे. 

शेवटच्या प्रकरणात मानवजातीसमोर एक स्पीशिज म्हणून कोणता महत्त्वाचा पर्याय उभा ठाकेल याबद्दल वाचायला मिळतं. आपल्या स्वत:बद्दल विचार करण्याचे दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे आपण ‘नॅचरल सिलेक्शन’मधून सजीव म्हणून उत्क्रांत होत गेलो. या दृष्टिकोनातून पाहिलं, तर माणूस जीन्समुळे घडतो आणि त्या जीन्सचं पुनरुत्पादन हा आपल्या आयुष्याचा हेतू असतो इतकंच आपल्या मनावर बिंबलेलं आहे; पण हॉकिन्सच्या मते आता आपण, केवळ हा जैविक दृष्टिकोन सोडून पुढे चाललो आहोत. आपण आता एक ‘बुद्धिमान स्पीशिज’ आहोत. विश्वाचा आकार आणि वयोमान माहिती असणारी आपली पहिली स्पिशी आहे. विश्वाचं रहस्य जाणून घेण्यासाठी साधनं तयार करणारे आपण पहिले आहोत. या अर्थानं, मानवाची व्याख्या आता बुद्धिमत्ता आणि ज्ञान या निकषांवर होऊ पाहते आहे... केवळ जीन्स वाहणारी एक स्पिशी एवढाच आपल्या अस्तित्वाचा अर्थ नाही. 

वेगळा विचार करणारं हे पुस्तक आहे.. ते मुळात वाचून समजावून घ्यायला हवं. 
(समाप्त)
- नीलांबरी जोशी

या पुस्तकाच्या परिचयाच्या पहिल्या दोन भागांच्या लिंक्स -
पहिला भाग : https://www.bytesofindia.com/P/PUCYCW
दुसरा भाग : https://www.bytesofindia.com/P/RUCNCW
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KUCHCW
Similar Posts
अ थाउजंड ब्रेन्स - भाग २ जेफ हॉकिन्स यांच्या ‘अ थाउजंड ब्रेन्स’ या पुस्तकाची ओळख करून देणाऱ्या लेखमालेचा हा दुसरा भाग.
अ थाउजंड ब्रेन्स - भाग १ जेफ हॉकिन्स यांच्या ‘अ थाउजंड ब्रेन्स’ या पुस्तकाची ओळख करून देणाऱ्या लेखमालेचा हा पहिला भाग...
काळोखाला भेदणारा प्रकाश समोर असतोच... काळोखाला भेदणारा प्रकाश समोर असतोच... जर त्याच्याकडे पाहायची हिंमत असेल तरच... जर स्वत: प्रकाश होण्याची हिंमत असेल तरच... जो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्याच्या सोहळ्यात आमंडा गॉर्मन या २२ वर्षांच्या कवयित्रीनं The Hill We Climb ही अप्रतिम कविता सादर केली. त्यातल्या या शेवटच्या ओळी
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून...! अन्न, वस्त्र, निवारा या मूळ गरजा भागवणारा मानव उत्क्रांत होत गेला तशा दया, करुणा अशा उन्नत समजल्या जाणाऱ्या सकारात्मक भावना त्याच्यात रुजत/दृढ होत गेल्या. तसं इस्टवूडनं सुरुवातीच्या चित्रपटात गुन्हेगार, मग इन्स्पेक्टर आणि नंतर मानसिक गुंतागुंत जाणणारा, दया, करुणा, प्रेम आणि मदतीचा हात पुढे करणारा नायक रंगवला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language